व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय?

व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणजे असे साधन ज्याद्वारे लोक किंवा व्यवसाय संस्था एखादा व्हिडिओ क्लिप मध्ये यशस्वीरीत्या बदल निर्माण प्रक्रिया तसेच हवे ते फेरफार करू शकतात. व त्या व्हिडिओला अधिक प्रभावी व आकर्षक बनवतात.
आजचे युग हे एक डिजिटल तसेच इंटरनेटचे युग झालेले आहे आज सर्व जगातील मोबाईल इंटरनेट व सोशल मीडियावर चालते आहे आज आपल्या आयुष्यातील आनंदाचा महत्त्वाचा क्षण तसेच प्रसंग असो आपण तो इतरांसोबत शेअर करण्यासाठी आपण त्याचा व्हिडिओ तयार करत असतो आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो अपलोड करत असतो.

अशाच आपल्या सोशल मीडिया अकाउंट साठी नियमित व्हिडिओ एडिटिंग करत असलेल्या प्रोफेशनल युट्यूबर्स तसेच सोशल मीडिया साठी आपण काही बेस्ट व्हिडिओ एडिटिंग कोणकोणत्या आहेत हे या लेखात पाहणार आहोत.

अँड्रॉइडसाठी टॉप तसेच बेस्ट 10 व्हिडीओ एडिटिंग ॲप्स पुढील प्रमाणे


  1. फिल्मोरा गो 
  2. काईन मास्टर 
  3. पाॅवर डायरेक्टर 
  4. क्विक
  5. व्हिव्हा व्हिडीओ
  6. व्हिडिओ शो 
  7. ॲडोब प्रीमियर क्लीप 
  8. फनीमेट 
  9. मूव्ही मेकर
  10. मॅजिस्टो व्हिडिओ एडिटर

आपण आज टीव्हीवर एखादा सिनेमा मालिका सुरू असते ती पाहण्यात आपण रंगून जातो किंवा चित्रपट पाहताना आपण हरखून जातो दर मिनिटाला बदलणारा निसर्ग हीरो हीरोइन पटापट कपडे कसे बदलतात वेगात चालणाऱ्या गाड्यांचे सलग चित्रण मारधाड करणारे हिरो रंगांची कमाल पौराणिक चित्रपट मालिकेतील अचानक गायब होणारे अथवा प्रकट होणारे देव राक्षस या सर्व गोष्टी नक्की घडतात कश जादू नक्की होते तरी कशी याची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. तर ही सर्व कमाल असते आधी कॅमेर्‍याची नंतर मालिका चित्रपटांचे संकलन म्हणजेच एडिटिंग करणाऱ्या व्यक्तीची अर्थातच एडिटरची.